विश्व मराठी परिषद

Oct 31, 20201 min

रुक्मिणी बोले पांडुरंगा

रुक्मिणी बोले पांडुरंगा

का हो नाथा...?

आळंदी ते पंढरपूर रस्ता सुना-सुना

मी नाही बोलली कुण्या भक्ता

नाही थकली तुळशी बुक्क्याचा सुगंधा

नाही शिनली गर्दी कोलाहटा

सांगा ना हो नाथा....

सुना-सुना का आपल्या वारीचा रस्ता...?

आली जवळ आषाढी एकादशी

आता कोण येईल आपल्या मंदिराशी

कान्होपात्रा वाट पाहे आषाढीची

गरुडखांब आतूरला संताच्या आलिंगणाशी

चंद्रभागा ही विचारे मजशी

माते तू काही खोडी केली का गं भक्ताशी...?

तीनशे पंचाहत्तर झाली वर्ष

दिंड्या पताका घेऊन भक्त येती अती हर्ष

यावर्षीच काय विपरीत घडले..?

देवालाच भक्तांनी वाळीत टाकले...?

अगं... अगं.. विश्वाची राणी तू रुक्मिणी

नाही रुसले तुजवर कुणी

कर्म धर्माचा संयोग आला जुळूनी

कोरोना संकट आले सकळ विश्वावरी

आपले भक्त शरीराने जरी घरी

मनाने पोहोचतील पंढरपुरी

माय-लेकरा पेक्षा श्रेष्ठ देव भक्ताचे नाते

नाही लागत त्याला रोड-रस्ते

मनोवेगेच आत्मा-परमात्मा चे मिलन होते...

मनोवेगेच आत्मा परमात्मा चे मिलन होते...

कवयित्री: अनुराधा वैजनाथ पुंडे (यवतमाळ)    

मो: 902128899

ईमेल: pundeprerana03@gmail.com


नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

    8051
    13