विश्व मराठी परिषद

Sep 12, 20201 min

हो.......ती एक स्त्री आहे

हो.......ती एक स्त्री आहे

तरीही.... 

हो तरीही

झिडकारून टाकले तिने

स्त्री च्या आतले बाईपण

आणि केले मुक्त स्वतःला

बाईपणाच्या दड़पणातून

आणि घेतली नजर ही 

बदलवून 

जी...... 

सतत माझं तुझं करत होती....... 

चांगले वाईट ठरवण्यातच

स्वतःला धन्य मानत होती

त्या  गुण दोषासहित 

तिने त्या बाईपणाला.. 

केले गंगेला अर्पण ...... 

आणि स्वतःच स्वतःच्या

मुक्तिच्या वाटा मोकळ्या 

केल्यात ..... 

उगाच ते गुण अंगी घेऊन

मिरवत होती,..... 

काय तर म्हणे...... 

एका स्त्री च्या अंगी 

द्वेष, ईर्षा, मत्सर हे

असायलाच लागतात

नव्हे ते जन्मजात

असतातच..... 

एका बाई ने दुसऱ्या

बाईला ईर्षेनेच बघितलेे

पाहिजे....... 

मग ती ईर्षा कशाची ही असू देत

कपड्यांची, दागिन्यांची, 

साडीची असो की गाडीची असो

की असो ती चेहऱ्याच्या रंगाची

ती मनी असायलाच

लागते म्हणे बाईच्या....... 

पण तिने धिक्कारले ते बाईपण

आणि त्या बाईपणाच्या

'सो कॉल्ड' गुणांनाही... 

नको तिला ह्या गुणांची माळ

जी तिच्या...... 

एका स्त्री च्या अस्तित्वाला

फ़ास लावेल....... 

तोडले तिने ते 'टिपिकल'

बाईपणाचे साखळदंड जे

बाईपणाला फुलांचे हार वाटायचे....... 

केसातील सुगंधित गजरा 

वाटायचे........ 

ती बाईपणातून मुक्त होऊन

आता केवळ स्त्री च्या मनातील 

प्रेमळ, पारदर्शक मायेचा झरा होऊन वाहते..... 

ती आता फक्त 'आई' म्हणून जगते.... 


 

कवयित्री: मंदा खंडारे

ईमेल: mandakhandare786@gmail.com

कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

    5061
    27