विश्व मराठी परिषद

Feb 9, 20211 min

आयुष्य

आयुष्याबद्दल खूप काही लिहिलं जातं

ह्याच गोष्टीबद्दल व्हावं लागत बोलतं

कारण ते जगण्याबद्दल कोण काय लिहितं

का जगावं कसं जगावं ह्याबद्दल पडलं नाही कुणाला कवडीचं

पण कुठे व कोणासाठी जगावं या प्रश्नांचं उत्तर आहे सवडीचं

हे प्रश्न ऐकून लोकं का म्हणतात तुम्हाला काय करायचंय

खरंतर या गोष्टींसाठीही आज आपल्या सर्वांना जगायचंय

निस्वार्थी व निरागस असो आयुष्य नको कुठलीही उणीव

पण जबाबदाऱ्यांची मात्र असो जाणीव

आयुष्य आपल्याला शिकवतं कसं जगायचं

त्यासाठी स्वतःत न राहता मनाला सर्व विश्वात असतं झोकायचं

अनेकजणं म्हणतात सर्वांना आयुष्य एकच लाभलंय

मग सर्वांनी मिळून ते आणखी सुंदर बनवू अजून काय हवंय


 

नाव: सानिका अशोक पुणतांबेकर.

ई-मेल: samatap2001@gmail.com

संपर्क: ८२९१०२५०९०.

12620
45